सभागृह आरक्षण सभासदांसाठी
वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. देवतलाव - वसई.
दूरध्वनी क्रमांक - २३२५०६७, २३२४१३८
सभागृह भाडे A/C हॉल व Non A/C
सकाळच्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
सभागृहाचे आरक्षणाचे नियम व अटी सभासदांसाठी
अ) सभागृहाच्या आरक्षणासाठी आरक्षण संबंधीचा विहित अर्ज संपूर्ण भरून द्यावा लागेल.
अ. क्र. | सभागृह व भोजनगृह | भाडे | अनामत | एकुण | भांडीभाडे अतिरीक्ते |
१ | वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ८ तास | ५०००० | १०००० | ६०००० | ८००० |
२ | बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ८ तास | २५००० | १०००० | ३५००० | ८००० |
३ | फक्त वातानुकुलीत हॉल ४ तासासाठी | २०००० | ५००० | २५००० | --- |
४ | वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ४ तास | २८००० | ८००० | ३६००० | ४००० |
५ | फक्त बिगर वातानुकुलीत हॉल ४ तास | १०००० | ३००० | १३००० | --- |
६ | बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ४ तास | १६००० | ५००० | २१००० | ४००० |
७ | फक्त भोजनगृह | १०००० | ५००० | १५००० | ४००० |
- १) आठ तास वातानुकुलित हॉलच्या पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रू. ३०००/- व बिगर वातानुकूलित सभागृहासाठी पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रू. १०००/- जादा भाडे आकारले जाईल. चार तास आरक्षण केलेले सभागृह जास्त वेळ सभागृह वापरल्यास प्रती तास रू. २०००/- भाडे आकारले जाईल. भांडीभाडे रू. ८०००/- व चार तासासाठी रू. ४०००/-.
- २) चार तासाठी सभागृह वातानुकूलित व बिगर वातानुकूलित केवळ बारसे, साखरपुडा, वाढदिवस किंवा लहान समारंभासाठीच दिले जाईल. व केवळ २५० व्यक्ती पर्यंतच मर्यादीत राहील.
- ३) सभागृह आरक्षित वेळेपर्यंतच वापरता येईल. वेळ संपण्याच्या अर्धा तास अगोदर पहीली बेल वाजवीली जाईल, त्यानंतर पंधरा मिनीटानी दुसरी बेल वाजवली जाईल व चार वाजता सभागृहांतील विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल.
ब) फक्त भोजनगृह घेणाऱ्यास २०० नग खुर्च्या मिळतील. त्या व्यतिरिक्त जादा खुर्च्या प्रत्येक नग रु.५/- प्रमाणे आकारणी केली जाईल.
क) सभागृहाच्या भाड्यात आरक्षण काळात वापरण्यासाठी मिळणारे सामान - खुर्च्या, पाट, मोठी टेबले, यज्ञकुंड व सुशोभित राजाराणी दोन खुर्च्या.
सभागृहास जेवणघर आरक्षित केल्यास जेवणाची टेबले, जादा खुर्च्या, जेवण शिजवण्यासाठी चार गॅस शेगड्या, १००० लोकांचे जेवणाचा भांडी संच व तीन बुफे झोपड्या.
( सभागृह आकारात मिळणाऱ्या भांड्यांची यादी सोबत जोडली आहे.) संस्थेने नेमलेल्या ठेकेदारांकडूनच भांडी घ्यावी लागतील. सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे भांडी भाडे रु. ८०००/- वेगळे भरावे लागतील. चार तासासाठी (२५० व्यक्ती ) भांडीभाडे रु. ४०००/- वेगळे भरावे लागेल. अतिरिक्त भांडी लागल्यास त्याचे भाडे भरावे लागेल.
ड) कॅटरर्सनी सभागृह आरक्षण दिनाच्या ८ दिवस अगोदर रु.५०००/- अनामत रक्कम कार्यालयात जमा करावी. सभागृहाचा ताबा सोडताना साफ सफाई न केल्यास ह्याच अनामत रक्कमेतून साफसफाईसाठी येणारा खर्च कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
इ) कॅटरर्सचे कर्मचारी रात्री मुक्कामास आले तर त्यांच्या कडून रु.३०००/- भाडे आकारले जाईल.
फ) मागणी प्रमाणे ज्यादा सुविधा :-
- व्हीडीओ शुटींग केल्यास प्रती व्हीडीओ शुटींगसाठी रु.४००/- जादा आकार द्यावा लागेल.
- विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटर वापरणे झाल्यास प्रती तास रु.४००/- प्रमाणे आकार आकारला जाईल.
- सभागृहाच्या इमारतीवर इलेक्ट्रीक तोरण सोडल्यास हजारी रु.५००/- जादा आकार द्यावा लागेल.
- सभागृहाच्या भाड्यात मिळणाऱ्या भांड्यांव्यतिरिक्त जादा लागणाऱ्या भांड्यांचे भाडे रोख द्यावे लागेल.
- स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची रक्कम आपणांस रोख द्यावी लागेल.
- गहाळ भांड्यांचा आकार द्यावा लागेल.
- हॅलोजन किंवा स्टॅण्ड फॅन लावल्यास प्रतिनग (५०० वॅटसाठी) रु.१५०/- प्रमाणे आकार द्यावा लागेल.
- साऊंड सिस्टीमसाठी रु.५००/- आकार द्यावा लागेल. वातानुकुलीत सभागृहासाठी साऊंड सिस्टीम विनामुल्य असेल.
सभागृहाच्या आरक्षणासंबंधीचे नियम व अटी
- सभागृह संस्थेच्या पुरुष सभासदांना स्वतःच्या, स्वतःच्या मुला-मुलींसाठी व सख्ख्या भावा-बहिणीच्या, तसेच कुटुंबातील नातवंडाच्या, पुतण्याच्या आणि स्त्री सभासदांना त्यांच्या स्वतःच्या आणि मुला-मुलींच्या लग्नासाठी सवलतीच्या दराने उपलब्ध राहील. ( नातवंड म्हणजे फक्त मुलाचा मुलगा-मुलगी, पुतण्या म्हणजे फक्त सख्ख्या भावाचा मुलगा-मुलगी )
- सभागृह आरक्षित केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्या कारणास्तव आरक्षण रद्द केल्यास सभागृहाच्या आकाराची रक्कम अर्जदारास परत मिळणार नाही. मात्र एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास अनामत रक्कम परत करणेचा परिस्थिती नुसार विचार केला जाईल. तो कार्यकारी मंडळाचा अधिकार राहील.
- सभागृह आरक्षित केल्यानंतर व कोणत्या कारणास्तव आरक्षण रद्द केल्यास व त्या तारखेस दुसऱ्या व्यक्तीने आरक्षणाबाबत नोंदणी केल्यास पहिले आरक्षण करणाऱ्या व्यक्तीला सभागृह भाड्याच्या १०% रक्कम कापून उर्वरित रक्कम अदा केली जाईल.
- संध्याकाळचे कार्यक्रमाचे वेळी रात्री ११.०० वाजेपर्यंत सभागृह खाली करून द्यावे लागेल. त्यानंतर सभागृहाचा वापर केल्यास प्रत्येक तासाला नियमाप्रमाणे जादा आकार भरावा लागेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत सभागृह रात्री १२.०० वाजता खाली करून दिलेच पाहिजे.
- सकाळचे कार्यक्रमासाठी दुपारी ४.०० वाजेपर्यंत सभागृह खाली करून द्यावे लागेल. त्यानंतर सभागृहाचा वापर केल्यास प्रत्येक तासाला नियमाप्रमाणे जादा आकार भरावा लागेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत सभागृह संध्याकाळी ५.०० वाजता खाली करून दिलेच पाहिजे.
- विवाह कार्याच्या आठ दिवस अगोदर विवाह पत्रिका अथवा कार्यक्रम पत्रिका तसेच जेवणगृहासह सभागृह आरक्षण असल्यास भांड्यांची यादी संस्थेच्या कार्यालयात आणून द्यावी व त्यावेळी संबंधित कॅटरर्सनी कार्यालयाशी संपर्क साधावा. अन्यथा कार्यक्रमास गैरसोय झाल्यास ती आपली जबाबदारी राहील. भोजनगृह आरक्षण करणाऱ्या व्यक्तीस बाहेरील भांडी बुफेसेट व झोपडी वापरण्यास मनाई आहे.
- अर्जदाराने ज्या दिवसासाठी सभागृह आरक्षित केले असेल त्या दिवशी स्वतः आपण किंवा आपल्या अधिकृत व्यक्ती मार्फत ताबा घेतला पाहिजे. इतर व्यक्तींना सभागृहाचा ताबा दिला जाणार नाही. सभागृह भोजनगृहासह आरक्षित असल्यास ताबा ताबा घेताना भांडी देखील ताब्यात घेणे आवश्यक आहे. मागाहून भांड्यांच्या गैरसोईबद्दलची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
- सभागृह आकार भरलेली पावती दाखविल्याशिवाय सभागृहाचा ताबा मिळणार नाही.
- सनई चौघडा या खेरीज अन्य कोणतेही वाद्य (बँड, ताशा, बँजो वगैरे) वाजविता येणार नाही. किंवा लाऊडस्पीकर लावता येणार नाही किंवा नाचगाणे म्हणता येणार नाही.
- ज्या व्यक्तीच्या विवाह कार्यासाठी व ज्या इतर कार्यासाठी सभागृह आरक्षित केले असेल त्या कार्यासाठीच सभागृह वापरता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यासाठी सभागृहाचा वापर करता येणार नाही. अर्जदारा व्यतिरिक्त इतर कोणीही सभागृहाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर कडक कारवाई केली जाईल. किंवा सभागृह नाकारता येईल. तसेच सभागृहाचा गैरवापर करणाऱ्या अर्जदाराने भरलेला आकार व अनामत रक्कम परत केली जाणार नाही.
- सभागृहात एकाच दिवशी एकच कार्य करता येईल. परंतु त्या दिवशी दोन कार्ये (सख्खे भाऊ-बहिण) करावयाचे असल्यास ५०% व इतर दोन कार्यासाठी १००% जादा सभागृह आकार भरावा लागेल. अशा प्रकारे दोन कार्ये करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. ती व्यक्तीशः अर्जदाराची जबाबदारी राहील.
- कोणत्याही कारणास्तव सभागृहातील अगर सभागृहाबाहेरील इलेक्ट्रीक फिटींगमध्ये अगर कोणत्याही बाबतीत संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बदल करता येणार नाही. अशा प्रकारे बदल केल्यास अर्जदार व्यक्तीस योग्य ती समाज दिली जाईलच शिवाय त्यांची अनामत रक्कम परत मिळणार नाही.
- सभागृहाच्या अगर सभागृहातील वस्तूंच्या (खुर्च्या, टेबले वगैरे) नुकसानी बाबत किंवा सभागृह सोडण्याच्या वेळे बाबत सभागृह व्यवस्थापकांचा रिपोर्ट सर्वस्वी ग्राह्य मानला जाईल.
- सभागृहाच्या अगर स्टेजच्या भिंतीवर अगर कोणत्याही जागेवर हाताचे पंजे मारण्यास किंवा सभागृहात कोठेही शिक्के मारण्यास अगर खिळे मारण्यास मनाई आहे. अशा किंवा इतर कोणत्याही प्रकारे सभागृहाची खराबी झाल्यास अर्जदारांस नुकसान भरपाई द्यावी लागेल.
- सभागृहात धुम्रपानास व मद्यपानास सक्त मनाई आहे. जेवण घराव्यतीरिक्त इतर ठिकाणी जेवण घेण्यास मनाई आहे.
- संस्थेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे पाळीव प्राणी आणण्यास अगर फटाके वाजवण्यास सक्त मनाई आहे.
- वधुवर व त्यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी ह्यांना संस्थेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे वाहन ठेवण्यास सक्त मनाई आहे. त्यांनी आपली वाहने संस्थेच्या मागे असलेल्या जागेतच पार्क करावी.
- अर्जदारांनी अगर त्यांच्या आमंत्रितांनी व पाहुण्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. त्या बाबतीत जबाबदारी त्यांची राहील.
- पाण्याचा वापर जपून करावा. काही कारणाने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास व मोटार पंपामध्ये बिघाड झाल्यास कार्याकरीता लागणारे पाणी अर्जदाराने स्वखर्चाने बाहेरून आणावे. त्याची जबाबदारी संस्थेच्या आस्थापनांवर राहणार नाही.
- निरनिराळ्या निवडणुकीसाठी व इतर कोणत्याही कारणास्तव महाराष्ट्रशासन अगर केंद्र शासनाने सभागृह ताब्यात घेतल्यास संस्थेला ते त्यांच्या ताब्यात देणे अपरिहार्य आहे. व त्या काळात जर कोणी सभागृहाचे आरक्षण केले असेल तर ते संस्थेला नाईलाजास्तव रद्द करणे भाग आहे. अशा वेळी ती जबाबदारी संस्थेवर राहणार नाही याची अर्जदाराने कृपया नोंद घ्यावी.
- वेळोवेळी प्रचलित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अन्य नियंत्रण कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
- सभागृहाच्या आरक्षणानंतर कार्य संपन्न होणेपुर्वी सभागृहाच्या आकारांत अपरिहार्य कारणास्तव वाढ झाल्यास वाढीव आकार अर्जदारास द्यावा लागेल व वाढीव आकार त्यास बंधनकारक असेल.
- सभागृह सोडण्यापूर्वी सभागृहाची संपूर्ण सफाई अर्जदाराकडून केलेली असावी. अन्यथा साफ सफाईसाठी होणारा खर्च अनामत रक्कमेतून कापून घेतला जाईल. तसेच मोडतोड झालेल्या सामानाची रक्कमही अनामत रक्कमेतून कापून घेतली जाईल.
- सभागृह आकार व अनामत रक्कमेची पावती परत आणल्याशिवाय अनामत रक्कम परत मिळणार नाही. तसेच ज्या व्यक्तीच्या नावे पावती असेल त्या व्यक्तीलाच अनामत रक्कम परत मिळेल. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस अनामत रक्कम परत दिली जाणार नाही.
- सभागृह भाडे रक्कमेवरती सेवाकराचे नियमास अधीन राहून सर्व्हिस टॅक्स आकारण्यात येईल.
नियमावली
सद्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर थैमान घातलेले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निरनिराळे उपाय योजना सुरू आहेत. सभागृह चा वापर करताना Government of Maharashtra Disaster Management Act 2005 आदेशाप्रमाणे खालील गोष्टींची काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास होणा–या कारवाईस सर्वस्वी आपणांस जबाबदार धरले जाईल याची नोंद घ्यावी.
आदेश
- आपल्या कार्यक्रमासाठी शासनाच्या धोरणाप्रामाणे त्या त्यावेळी व्यक्ती मर्यादा ग्रााहय धरण्यात येईल.
- आपल्या कार्यक्रमासाठी शासनाच्या धोरणाप्रामाणे असणारया परवानग्या आपणास आणाव्या लागतील.
- आपल्या सर्व पाहुुण्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
- सर्व पाहुुण्यांनी आपले हात सॅनीटायझराईज करणे बंधनकारक आहे.
- येणा–या सर्व पाहुुण्यां मध्ये सोशल डिस्टन्स् असणे बंधनकारक आहे.
- सभागृहात धुम्रपानास थुंकण्यास व मद्यपानास सक्त मनाई आहे.
- वेळोवेळी प्रचलित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अन्य नियंत्रण कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.