ताज्या बातम्या
भारत गौरव पुरस्कार
वसई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गेली ७३ वर्षे काम करणाऱ्या वसई शेतकरी सहकारी सोसायटीच्या कार्याची दखल घेऊन संस्थेस ऑल इंडिया अचिवर्स फाऊंडेशनच्या वतीने संस्थेस "भारत गौरव पुरस्कार", २०१२ साठी माजी राज्यपाल भिष्मनारायण सिंग ह्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिल्ली येथील गुलमोहर हॉलमध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमाला माजी राज्यपाल भिष्मनारायण सिंग, माजी निवडणूक आयुक्त जीव्हीजी कृष्णमुर्ती, माजी मुख्य न्यायाधीश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने चेअरमन श्री. आशय हरेश्वर राऊत ह्यांनी हा पुरस्कार स्विकारला.
इंटरनॅशनल अचिव्हर पुरस्कार
"भारत गौरव पुरस्कार" २०१२ प्राप्त झाल्यानंतर काही कालावधीनंतर संस्थेस इंटरनॅशनल अचिव्हर्स कॉन्फरन्सचा "इंटरनॅशनल अचिव्हर पुरस्कार" प्राप्त झाला आहे. या पुरस्काराने सोसायटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण झाले.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटणारी संस्था व भारतगॅस ग्राहकांसाठी उत्तम सेवा देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. हे कार्य पाहूनच सोसायटीला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी थायलंड मधील राजकीय नेते उपस्थित होते. दोनही पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्थेचे नाव हे राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर जावून पोहोचले आहे.
सहकार भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या वतीने संस्थेस सहकार भूषण पुरस्कार - २०१३ कोकण विभागासाठी गौरविण्यात आले. दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानपत्र देण्यात आले.