सभागृह आरक्षण बिगर सभासदांसाठी
वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. देवतलाव - वसई.
दूरध्वनी क्रमांक - २३२५०६७, २३२४१३८
सभागृह भाडे A/C हॉल व Non A/C
सकाळच्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
सभागृहाचे आरक्षणाचे नियम व अटी ( बिगर सभासदांसाठी )
अ) सभागृहाच्या आरक्षणासाठी आरक्षण संबंधीचा विहित अर्ज संपूर्ण भरून द्यावा लागेल.
अ. क्र. | सभागृह व भोजनगृह | भाडे | अनामत | एकुण | भांडीभाडे | एकुण |
१ | वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ८ तासासाठी | ७०००० | १८००० | ८८००० | ८००० | ९६००० |
२ | बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ८ तासासाठी | ४५००० | १५००० | ६०००० | ८००० | ६८००० |
३ | फक्त वातानुकुलीत हॉल ४ तासासाठी | ३०००० | १०००० | ४०००० | ० | ४०००० |
४ | वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ४ तासासाठी | ३८००० | १२००० | ५०००० | ४००० | ५४००० |
५ | फक्त बिगर वातानुकुलीत हॉल ४ तासासाठी | १८००० | ५००० | २३००० | ० | २३००० |
६ | बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ४ तासासाठी | २३००० | १०००० | ३३००० | ४००० | ३७००० |
७ | फक्त भोजनगृह | १८००० | १०००० | २८००० | ४००० | ३२००० |
१) आठ तास वातानुकूलित हॉलच्या पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रु. ५०००/- व बिगर वातानुकूलित सभागृहासाठी पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रु. २०००/- जादा भाडे आकारले जाईल. चार तास आरक्षण केलेले सभागृह जास्त वेळ सभागृह वापरल्यास प्रती तास रू. ५०००/- भाडे आकारले जाईल.
२) चार तासांसाठी सभागृह वातानुकूलित व बिगर वातानुकूलित केवळ बारसे, साखरपुडा, वाढदिवस किंवा लहान समारंभासाठीच दिले जाईल व केवळ २५० व्यक्ती पर्यंतच मर्यादित राहील.
३) सभागृह आरक्षित वेळेपर्यंतच वापरता येईल. वेळ संपण्याच्या अर्धा तास अगोदर पहिली बेल वाजविली जाईल, त्यानंतर पंधरा मिनिटांनी दुसरी बेल वाजविली जाईल व चार वाजता सभागृहातील विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल. संस्थेच्या सभागृहाचे नियमाविरूध्द कृती केल्यास सभागृह आरक्षण करणा–या व्यक्तीकडून दंडाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.
ब) फक्त भोजनगृह घेणाऱ्यास २०० नग खुर्च्या मिळतील. त्या व्यतिरिक्त जादा खुर्च्या प्रत्येक नग रु.५/- प्रमाणे आकारणी केली जाईल.
क) सभागृहाच्या भाड्यात आरक्षण काळात वापरण्यासाठी मिळणारे सामान - खुर्च्या, पाट, मोठी टेबले, यज्ञकुंड व सुशोभित राजाराणी दोन खुर्च्या.
सभागृहास जेवणघर आरक्षित केल्यास जेवणाची टेबले, जादा खुर्च्या, जेवण शिजवण्यासाठी चार गॅस शेगड्या, १००० लोकांचे जेवणाचा भांडी संच व तीन बुफे झोपड्या.
(सभागृह आकारात मिळणाऱ्या भांड्यांची यादी सोबत जोडली आहे.) संस्थेने नेमलेल्या ठेकेदारांकडूनच भांडी घ्यावी लागतील. सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे भांडी भाडे
रु. ८०००/- वेगळे भरावे लागतील. चार तासासाठी (२५० व्यक्ती ) भांडीभाडे रु. ४०००/- वेगळे भरावे लागेल. अतिरिक्त भांडी लागल्यास त्याचे भाडे भरावे लागेल.
ड) सभागृहाचा ताबा सोडताना साफ सफाई न केल्यास ह्याच अनामत रक्कमेतून साफसफाईसाठी येणारा खर्च कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल.