• मुख्यपृष्ठ
  • आमच्या विषयी
    • प्रोफाइल
    • चेअरमन संदेश
    • संचालक मंडळ
    • शाखा
    • वार्षिक अहवाल
  • सेवा
    • मुदत व बचत ठेव
    • शेतकी कर्ज
  • वितरक
  • सामाजिक कार्य
  • सभागृह आरक्षण
    • सभासदांसाठी
    • बिगर सभासदांसाठी
    • सभागृह आरक्षण चौकशी
    • सभागृह फोटो गॅलरी
  • भारतगॅस
  • संपर्क

सभागृह आरक्षण सभासदांसाठी

वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. देवतलाव - वसई.

दूरध्वनी क्रमांक - २३२५०६७, २३२४१३८

सभागृह भाडे A/C हॉल व Non A/C

सकाळच्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत



सभागृहाचे आरक्षणाचे नियम व अटी सभासदांसाठी


अ) सभागृहाच्या आरक्षणासाठी आरक्षण संबंधीचा विहित अर्ज संपूर्ण भरून द्यावा लागेल.

अ. क्र. सभागृह व भोजनगृह भाडे अनामत एकुण भांडीभाडे अतिरीक्ते
१ वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ८ तास ५०००० १०००० ६०००० ८०००
२ बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ८ तास २५००० १०००० ३५००० ८०००
३ फक्त वातानुकुलीत हॉल ४ तासासाठी २०००० ५००० २५००० ---
४ वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ४ तास २८००० ८००० ३६००० ४०००
५ फक्त बिगर वातानुकुलीत हॉल ४ तास १०००० ३००० १३००० ---
६ बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ४ तास १६००० ५००० २१००० ४०००
७ फक्त भोजनगृह १०००० ५००० १५००० ४०००

  • १) आठ तास वातानुकुलित हॉलच्या पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रू. ३०००/- व बिगर वातानुकूलित सभागृहासाठी पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रू. १०००/- जादा भाडे आकारले जाईल. चार तास आरक्षण केलेले सभागृह जास्त वेळ सभागृह वापरल्यास प्रती तास रू. २०००/- भाडे आकारले जाईल. भांडीभाडे रू. ८०००/- व चार तासासाठी रू. ४०००/-.
  • २) चार तासाठी सभागृह वातानुकूलित व बिगर वातानुकूलित केवळ बारसे, साखरपुडा, वाढदिवस किंवा लहान समारंभासाठीच दिले जाईल. व केवळ २५० व्यक्ती पर्यंतच मर्यादीत राहील.
  • ३) सभागृह आरक्षित वेळेपर्यंतच वापरता येईल. वेळ संपण्याच्या अर्धा तास अगोदर पहीली बेल वाजवीली जाईल, त्यानंतर पंधरा मिनीटानी दुसरी बेल वाजवली जाईल व चार वाजता सभागृहांतील विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल.

ब) फक्त भोजनगृह घेणाऱ्यास २०० नग खुर्च्या मिळतील. त्या व्यतिरिक्त जादा खुर्च्या प्रत्येक नग रु.५/- प्रमाणे आकारणी केली जाईल.

क) सभागृहाच्या भाड्यात आरक्षण काळात वापरण्यासाठी मिळणारे सामान - खुर्च्या, पाट, मोठी टेबले, यज्ञकुंड व सुशोभित राजाराणी दोन खुर्च्या.
सभागृहास जेवणघर आरक्षित केल्यास जेवणाची टेबले, जादा खुर्च्या, जेवण शिजवण्यासाठी चार गॅस शेगड्या, १००० लोकांचे जेवणाचा भांडी संच व तीन बुफे झोपड्या.
( सभागृह आकारात मिळणाऱ्या भांड्यांची यादी सोबत जोडली आहे.)
संस्थेने नेमलेल्या ठेकेदारांकडूनच भांडी घ्यावी लागतील. सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे भांडी भाडे रु. ८०००/- वेगळे भरावे लागतील. चार तासासाठी (२५० व्यक्ती ) भांडीभाडे रु. ४०००/- वेगळे भरावे लागेल. अतिरिक्त भांडी लागल्यास त्याचे भाडे भरावे लागेल.

ड) कॅटरर्सनी सभागृह आरक्षण दिनाच्या ८ दिवस अगोदर रु.५०००/- अनामत रक्कम कार्यालयात जमा करावी. सभागृहाचा ताबा सोडताना साफ सफाई न केल्यास ह्याच अनामत रक्कमेतून साफसफाईसाठी येणारा खर्च कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल.

इ) कॅटरर्सचे कर्मचारी रात्री मुक्कामास आले तर त्यांच्या कडून रु.३०००/- भाडे आकारले जाईल.

फ) मागणी प्रमाणे ज्यादा सुविधा :-

  • व्हीडीओ शुटींग केल्यास प्रती व्हीडीओ शुटींगसाठी रु.४००/- जादा आकार द्यावा लागेल.
  • विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटर वापरणे झाल्यास प्रती तास रु.४००/- प्रमाणे आकार आकारला जाईल.
  • सभागृहाच्या इमारतीवर इलेक्ट्रीक तोरण सोडल्यास हजारी रु.५००/- जादा आकार द्यावा लागेल.
  • सभागृहाच्या भाड्यात मिळणाऱ्या भांड्यांव्यतिरिक्त जादा लागणाऱ्या भांड्यांचे भाडे रोख द्यावे लागेल.
  • स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची रक्कम आपणांस रोख द्यावी लागेल.
  • गहाळ भांड्यांचा आकार द्यावा लागेल.
  • हॅलोजन किंवा स्टॅण्ड फॅन लावल्यास प्रतिनग (५०० वॅटसाठी) रु.१५०/- प्रमाणे आकार द्यावा लागेल.
  • साऊंड सिस्टीमसाठी रु.५००/- आकार द्यावा लागेल. वातानुकुलीत सभागृहासाठी साऊंड सिस्टीम विनामुल्य असेल.

© 2015, वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.   |   designed by OCS