बॅक्वेट हॉल सभागृह आरक्षण सभासदांसाठी
वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. देवतलाव - वसई.
दूरध्वनी क्रमांक - २३२५०६७, २३२४१३८
सभागृह भाडे A/C हॉल व Non A/C
सकाळच्या कार्यक्रमासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
बॅक्वेट हॉल सभागृहाचे आरक्षणाचे नियम व अटी ( सभासदांसाठी )
अ) सभागृहाच्या आरक्षणासाठी आरक्षण संबंधीचा विहित अर्ज संपूर्ण भरून द्यावा लागेल.
अ. क्र. | सभागृह व भोजनगृह | भाडे | अनामत | एकुण |
१ | वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ५ तासासाठी | २२००० | ८००० | ३०००० |
२ | बिगर वातानुकुलीत हॉल व भोजनगृह ५ तासासाठी | १५००० | ७००० | २२००० |
३ | फक्त वातानुकुलीत हॉल ५ तासासाठी | १६००० | ५००० | २१००० |
४ | बिगर वातानुकुलीत हॉल ५ तासासाठी | १०००० | ५००० | १५००० |
१) पाच तास वातानुकुलित हॉलच्या पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रू. २०००/- व बिगर वातानुकूलित सभागृहासाठी पुढील प्रत्येक तासास सभासदांसाठी रू. १०००/- जादा भाडे आकारले जाईल.
२) पाच तासांसाठी सभागृह वातानुकूलित व बिगर वातानुकूलित केवळ बारसे, साखरपुडा, वाढदिवस किंवा लहान समारंभासाठीच दिले जाईल.
३) सभागृह आरक्षित वेळेपर्यंतच वापरता येईल. वेळ संपण्याच्या अर्धा तास अगोदर पहीली बेल वाजवीली जाईल, त्यानंतर पंधरा मिनीटानी दुसरी बेल वाजवली जाईल व चार वाजता सभागृहांतील विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल.
४) सभागृहाचा ताबा सोडताना साफ सफाई न केल्यास ह्याच अनामत रक्कमेतून साफसफाईसाठी येणारा खर्च कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
५) मागणी प्रमाणे ज्यादा सुविधा :-
- व्हीडीओ शुटींग केल्यास प्रती व्हीडीओ शुटींगसाठी रु. ४००/- जादा आकार द्यावा लागेल.
- विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटर वापरणे झाल्यास प्रती तास रु. ४००/- प्रमाणे आकार आकारला जाईल.
- सभागृहात लागणाऱ्या भांड्यांचे भाडे रोख द्यावे लागेल.
- स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची रक्कम आपणांस रोख द्यावी लागेल.
- हॅलोजन किंवा स्टॅण्ड फॅन लावल्यास प्रतिनग (५०० वॅटसाठी) रु. १५०/- प्रमाणे आकार द्यावा लागेल.
- सभागृह भाडे रक्कमेवरती सेवाकराचे नियमास अधीन राहून सर्व्हिस टॅक्स आकारण्यात येईल.